सवतकडा धबधबा - खेडगे,भुदरगड, कोल्हापूर

About The Event

भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे या भागात एकाच ठिकाणी सात वेगवेगळे नैसर्गिक धबधबे असलेला सवतकडा धबधबा म्हणजे निसर्गाचा एक अद्वितीय खजिनाच आहे. या नैसर्गिक ठेव्याचा विकास करून तो पर्यटकांसाठी खुला करणं, हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता.

वनविभाग, स्थानिक ग्रामस्थ आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने सुमारे ३.४४ कोटींच्या निधीतून विविध सुविधा, पायवाटा, सुशोभीकरण आणि माहिती फलकांचे काम पूर्ण करण्यात आले. यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांना केवळ धबधब्याचं सौंदर्यच नाही, तर जंगल, शेती, स्थानिक जीवनशैली यांचाही अनुभव घेता येतो.

आरोग्यमंत्री ना. प्रकाशराव आबिटकर यांणी प्रत्येक स्थळाला भेट दिली, कामांची पाहणी केली आणि पर्यटकांशी संवाद साधला. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून वाटलं की आपले प्रयत्न योग्य दिशेने चालले आहेत. या परिसराचा विकास म्हणजे निसर्ग पर्यटनाचं बळकटीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणं हे दोन उद्देश साध्य झालेत.

या यशस्वी प्रकल्पामागे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी आर.एम. रामानुजन आणि जी. गुरुप्रसाद यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच, आज इथे पर्यटन कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही माझ्या हस्ते करण्यात आले, ज्यामुळे या भागाची ओळख अधिक व्यापक पातळीवर होईल.

या प्रसंगी कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे, गारगोटी वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक, बाबा नांदेकर यांच्यासह संबंधित गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Event Information

सवतकडा धबधब्याचा विकास निसर्ग पर्यटन व स्थानिक विकासाचा संगम

Event Date

१९ जुलै २०२५

Event Location

भुदरगड, कोल्हापूर

Book Ticket